व्हेरिकोज व्हेन्स साठी जीवनशैलीत बदल व व्यायाम

व्हेरिकोज व्हेन्स साठी जीवनशैलीत बदल व व्यायाम

best varicose veins treatment nashik

व्हेरिकोज वेन कुठल्याही व्यायामाने अथवा औषधाने बरे होत नाही पण जीवन शैलीतल्या काही बदलांनी अथवा व्यायामाने त्या या पुढे वाढणार नाही ह्याची काळजी आपण घेऊ शकतो

  1. व्यायाम

रोज काही वेळ चालल्याने व्हेरिकोज वेन पुढे काही कॉम्प्लिकेशन्स मध्ये वाढणार नाही याला मदत मिळू शकते कारण चालल्यामुळे आपल्या पायातील रक्तप्रवाह वाढतो व  वेन सला मदत होते

आपल्या डॉक्टर कडे आपल्याला कुठल्या प्रकारच्या व्हेरिकोज व्हेन्स आहेत हे जाणून घ्या व त्यासाठी किती वेळ चालावे लागेल अथवा व्यायाम करावा लागेल हे ते योग्य प्रकारे सांगू शकतील

  1. वजनावर आहारावर लक्ष द्या

अति वजनाच्या लोकांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स चे प्रमाण अधिक असते कारण आपले वाढलेले अतिरिक्त वजन आपल्या पायांच्या वेनस वर अतिरिक्त दबाव देतात त्यामुळे मुळे आपल्या आहारावर जर आपण नियमन टाकलं व वजनासाठी काळजी घेतली तर व्हेरिकोज व्हेन्स वाढणार नाही

  1. योग्य प्रकारचे पादत्राणे

उंच टाचेच्या चप्पल ह्या व्हेरिकोज वेन रुग्णांसाठी निषिद्ध समजायच्या

कमी टाचेच्या चपलांनी आपले काफ म्हणजेच पोटरीच्या मसल म्हणजेच स्नायू योग्य प्रकारे काम करतात त्यामुळे आपल्या व्हेन्सला रक्ताभिसरणास मदत होते

  1. योग्य प्रकारचे कपडे

आपल्या कमरेला अथवा पायांना किंवा आतील अंगास अतिशय टाईट असे कपडे घालू नये त्याने रक्ताभिसरणास त्रास होतो. याच्यापेक्षा आपल्या डॉक्टरांना दाखवून एका वेगळ्या प्रकारचे मोजे ज्यांना कम्प्रेशन स्टॉकिंग असं म्हणतात ते सांगितलेल्या भागात घालने उत्तम होईल

  1. अति उभे राहणे अथवा बसने टाळावे

एकाच पोझिशनमध्ये खूप वेळ बसून अथवा उभे राहिल्याने पायातील रक्ताभिसरण अडचण येते यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात खूप वेळ उभे राहणे अथवा बसणे टाळावे

  1. झोपण्याची शैली

 

जर आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स ना त्रास असेल तर रात्री झोपताना दोन ते चार पिलो पायाखाली ठेवल्याने आपल्या रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते जर रात्रभर उषा पायाखाली ठेवताना जमत नसेल तर आपण पण आपली गादी मॉडीफाय करून घ्यावी

  1. व्यायाम

आपल्या दैनंदिन जीवनात मध्ये मध्ये छोटे-छोटे ब्रेक घेऊन आपण आपले पाय वरती घेऊन बसल्यास रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *