मरणाच्या दारात पोचलेल्या २२ वर्षीय जयवंतला मिळाले नवीन जीवदान

मरणाच्या दारात पोचलेल्या २२ वर्षीय जयवंतला मिळाले नवीन जीवदान

 

जयवंत जाधव (वय 22) या तरुणाचा 29 सप्टेंबर 2019 ला अपघात झाला व त्यात त्याच्या जननेंद्रियचा भाग, पोटाच्या खालचा भाग, मांड्या आदी भाग छिन्नविच्छिन्न झाला होता. अपघातानंतर जयवंतला तातडीने सटाणा येथील अद्ययावत सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे शल्यविशारद डॉ. सचिन देवरे, डॉ. संदेश लेखन, डॉ. हरजितसिंग कथुरिया, डॉ. तुषार वाघ यांनी तातडीचे उपचार केले.
अपघातात जयवंतचा कमरेखालचा बराचसा भाग छिन्नविच्छिन्न झाला होता. त्याचा जीवन-मरणाशी संघर्ष सुरू होता. उपचारादरम्यान त्यावर टप्प्याटप्प्याने सुमारे नऊ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

प्राथमिक तपासणीत अतिरक्तस्त्राव, तुटलेले कमरेचा, ओटीपोटाचा व मांड्याचा भाग यातून त्याला तातडीने सुरवातीचे अत्यंत महत्त्वाचे उपचार देण्यात आले. रक्‍तदाब वाढावा म्हणून लाइफ सपोर्टिंग इंजेक्‍शन देऊन नाशिक येथील निम्स हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड येथे प्लास्टिक सर्जन डॉ. मनोज बच्छाव, जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. सचिन देवरे यांनी जयवंत याच्या टप्प्याटप्प्याने सुमारे नऊ शस्त्रक्रिया केल्या. अवघड शस्त्रक्रिया करून जयवंतवर यशस्वी उपचार करण्यात आले. क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट डॉ. महेश बनसोड यांनीही मेहनत घेतली.

वेळीच उपचार मिळाल्याने तज्ज्ञ डॉक्‍टरांचे कसब व जयवंत यांची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्‍ती त्याला मरणाच्या दारातून पुन्हा सुखरूप घेऊन आली. विशेष म्हणजे एकवेळ प्राण वाचतील की नाही, अशी स्थिती असताना जयवंत स्वत: कुठल्याही आधाराविना चालू लागला.अडीच महिने झोपून असलेला जयवंत उपचारानंतर सुखरूप घरी गेला.

उपचारानंतर जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. सचिन देवरे यांनी सांगितले कि, जयवंतला पूर्ण बरे करण्यात निम्स हॉस्पिटलच्या आयसीयूच्या स्टाफने मेहनत घेतली. प्लास्टिक सर्जन डॉ. बच्छाव, डॉ. महेश बनसोड यांनी विशेष मेहनत घेतली. अशा रुग्णांना घरी पाठवताना खूप आनंद होतो.

प्लास्टिक सर्जन डॉ. मनोज बच्छाव यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली कि, जयवंतच्या केसमध्ये सुमारे पाच प्लास्टिक सर्जरी कराव्या लागल्या आणि आज त्याला पूर्ववत करून घरी पाठवताना प्लास्टिक सर्जन म्हणून समाजात असल्याचा वेगळा आनंद वाटतो.
जयवंत जाधव (रुग्ण) याने त्याचा अनुभव व्यक्त करताना सांगितले कि, अडीच महिने आयसीयूमध्ये अनेक अनुभव आले. मी निम्स हॉस्पिटलचा एक भाग होऊन गेलो होतो. खर्चिक प्रक्रिया असताना डॉ. सचिन देवरे, डॉ. मनोज बच्छाव यांनी हॉस्पिटलच्या बिलात विशेष सवलत देली. निम्स हॉस्पिटलचा व सर्व टीमचा मी ऋणी राहील.

मनोज बच्छाव, नामांकित प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन, नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *